बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (23:32 IST)

Ladakh: कुन पर्वतावर हिमस्खलनात भारतीय लष्कराचा गट अडकला, एका जवानाचा मृत्यू, 3 बेपत्ता

Ladakh:माऊंट कुन जवळ भारतीय लष्कराच्या तुकडीला हिमस्खलनाचा तडाखा बसला. लडाखमधील कुन पर्वतावर हिमस्खलनात भारतीय लष्कराच्या गिर्यारोहकांचा एक गट अडकला. सोमवारी भारतीय लष्करातील एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. त्याचवेळी तीन जवान बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. या जवानाचा मृतदेह सापडला आहे. 
 
या दुर्घटनेत तीन जवान बेपत्ता असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. माउंट कुनजवळ हिमस्खलनात एका सैनिकाचा मृत्यू झाला, तर इतर तीन बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
 
हे सैनिक पर्वतारोहण प्रशिक्षणासाठी गेले होते.संरक्षण सूत्रांनी सांगितले की, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (HAWS) आणि लष्कराच्या आर्मी अॅडव्हेंचर विंगमधील सुमारे 40 लष्करी जवानांचा एक तुकडा माउंट कुन (लडाख) जवळ नियमित प्रशिक्षण क्रियाकलापांमध्ये गुंतला होता.
 
 
 
 




Edited by - Priya Dixit