चारा घोटाळाप्रकरणी लालू यांना 3.5 वर्षांची शिक्षा
बिहारच्या राजनैतिक केंद्र बिंदू असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांना चारा घोटाळ्याच्या प्रकरणात सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने 3.5 वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंना या प्रकरणी जामीन मिळणार नाही. दंड भरला नाही, तर लालूंना सहा महिने अधिक तुरुंगात राहावं लागेल.
या अगोदर लालू समेत प्रकरणात दहा आरोपींच्या शिक्षेवर शुक्रवारी सीबीआयच्या स्पेशल कोर्टात सुनावणी झाली होती. या दरम्यान लालू यादव यांची व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमाने होटवार जेलमध्ये पेशी झाली. जस्टिस शिवपाल सिंह यांनी आज (शनिवारी) दुपारी दोन वाजता उरलेल्या बाकीच्या 6 आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी केली.
लालू यांना शिक्षा ठोठावण्याअगोदर पटण्यात आरजेडीची एक इमरजेंसी मीटिंग बोलवण्यात आली. पटनामध्ये 10 सर्कुलर रोडवर स्थित पूर्व सीएम राबडी देवी यांच्या सरकारी आवासावर आयोजित या बैठकीत पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.