एलोसी वर तणाव तर देशातील अनेक विमान तळे उड्डाणासाठी बंद
भारताने चोख उत्तर देऊन पाकिस्तानला विचार करायला भाग पाडले आहे. मात्र आता सीमेवर तणाव वाढला असून, त्यामुळे सरकार अनेक मोठे निर्णय घेत आहे. पाकिस्तानने हावाई हद्दीचे उल्लंघन केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील विमानतळ बंद करण्यात आली आहेत. देशातील जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड, डेहराडून, धरमशाला, लेह विमानसेवा बंद केली आहे. नंतर पाकिस्तानमधील देखील ५ विमानतळ बंद करण्यात आली असून, लाहौर, मुलतान, फैजालाबाद, इस्लामाबाद, सियालकोट ही पाच विमानतळ त्यांनी बंद केली आहेत. तर दोन्ही देशांमधील देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय हवाईसेवेवर परिणाम झाला आहे.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तानने काल संध्याकाळपासून भारताविरोधात कारवाईला सुरुवात केलीय, तर एलओसीवर पाकिस्तांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून तणाव वाढत आहे. पाकिस्तान ने भारातच्या दिशेने जोरदार गोळीबार त्याचसोबत ग्रेनेड हल्ले केले आहेत. नंतर पाकिस्तानने भारताच्या हद्दीमध्ये विमान घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. भारताने पाकिस्तानचे विमान पाडले. एलओसीजवळ आणि देशातील प्रमुख राज्यांमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशातील सबंध चांगलेच तणावाचे झाले आहेत.