मनीष सिसोदियाची कोठडी 22 जुलैपर्यंत वाढवली
दिल्ली न्यायालयाने सोमवारी आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडी वाढवली.
सीबीआय आणि ईडीच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआय आणि ईडीने नोंदवलेल्या भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांचा जामीन अर्ज न्यायालयाने 30 एप्रिल रोजी फेटाळला होता. सीबीआय आणि ईडी तसेच सिसोदिया यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
Edited by - Priya Dixit