मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (17:13 IST)

सहा महिन्यांच्या बाळासह आईने 16व्या मजल्यावरून उडी मारली, दोघांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा येथील लॉ रेसिडेन्शिया टॉवर-2 मध्ये एका महिलेने तिच्या सहा महिन्यांच्या मुलासह 16व्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (10 जानेवारी) सकाळी लॉ रेसिडेन्सी सोसायटीत एका महिलेने तिच्या 6 महिन्यांच्या मुलीसह 16 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती बिसरख पोलीस ठाण्याला मिळाली. ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत होती.
 
महिलेच्या भावाने सांगितले की, त्याची 33 वर्षीय बहीण आजारी होती आणि ती डिप्रेशनमध्ये होती. याप्रकरणी बिसरख पोलीस ठाण्यात पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.