गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2017 (09:14 IST)

तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक

जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथेून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. संदीप शर्मा उर्फ आदिल असं या दहशतवाद्याचं नाव आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले की, 1 जुलै रोजी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करीचा खात्मा करण्यात आला. संदीप शर्मादेखील त्याच घरात होता, जेथे लश्करीनं लपून राहिला होता. एटीएम लुटणे व अन्य दहशतवादी कारवायांमध्ये संदीपचा सहभाग आहे.  

 
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले राम शर्मा यांचा मुलगा संदीप शर्माला पोलिसांनी मुझफ्फरनगर येथून अटक केली. शिवाय संदीपनं स्वतःचे नाव बदलून आदिले असे ठेवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.