बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (12:04 IST)

NEET: वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे फॉर्म आजपासून भरता येणार,परीक्षा 12 सप्टेंबरला

वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) येत्या 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली.
 
आज (13 जुलै) संध्याकाळी पाच वाजल्यापासून NTA (NationalTesting Agency) वेबसाईटवर प्रवेश परीक्षा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेदरम्यान सुरक्षित अंतर असावे यासाठी परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांची संख्या 155 वरुन 198 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर परीक्षा केद्रांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे.
 
सर्व परीक्षा केंद्रांवर मास्क दिला जाणार आहे.
 
 
नीट ही प्रवेश परीक्षा एमबीबीएस,बीडीएस,आयुष आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते. महाराष्ट्रात साडेसहा हजार प्रवेशांच्या जागांसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी स्पर्धेत असतात.
 
नीट या एन्ट्रास परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नीटचं रँकिंग अत्यंत महत्त्वाचं असतं.


देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षा रखडल्या आहेत.
 
याआधी,नॅशनल टेस्टिंग एजंसीनेही वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट 1 ऑगस्ट रोजी होणार असं म्हटलं होतं. त्याच वेळी ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते असं देखील ते म्हणाले होते. पण आता उद्यापासून फॉर्म उपलब्ध होणार असल्यामुळे नीटची परीक्षा 12 सप्टेंबर रोजी होईल यावर शिक्कामोर्तब झाले आहे.