निर्भयाच्या दोषींची फाशी टळली
निर्भया प्रकरणात दोषींना पुढील आदेशापर्यंत फाशी नाही. दिल्ली कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र आज दिल्ली कोर्टाने यासंदर्भातला निर्णय दिला आहे.
पटियाला हाउस कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषींसाठी फाशीसाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.