शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (10:11 IST)

North East Express: चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

murder
गुवाहाटीहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाने सोमवारी पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकाजवळ स्वत:वर गोळी झाडली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृताची ओळख पटू शकली नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
 
नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे (NFR) चे प्रवक्ते सब्यसाची डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8 च्या सुमारास प्रवाशाने ट्रेनच्या जनरल डब्यात स्वतःवर गोळी झाडली. गोळीबारानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एनएफआरच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवासी तिकीट किंवा त्याचे कोणतेही ओळखपत्र आणि इतर कोणत्याही कागदपत्रांसह सापडले नाहीत. त्यामुळे मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
 
 प्रवक्त्याने सांगितले की, फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे, मृत व्यक्ती बंदूक घेऊन ट्रेनमध्ये कोठून चढला हे स्पष्ट झाले नाही. नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस गुवाहाटी ते नवी दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलपर्यंत धावते.
Edited by : Smita Joshi