शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (17:21 IST)

हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, दोघांचा मृत्यू

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट या हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगार दगावले आहेत. 
 
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एम-३ मध्ये गॅलेक्सी सरफॅक्टटंट ही हँडवॉश आणि सॅनिटायझर बनवणारी कंपनी आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास इथे भीषण स्फोट झाला. सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आला.
 
तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्फोट झाला तेव्हा कंपनीत ६६ कामगार काम करीत होते.