शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (11:39 IST)

निर्भया प्रकरण : पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

निर्भया सामुहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. पवनने आपल्या याचिकेत आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करावी ही विनंती दाखल केली होती. यापूर्वी त्याची रिव्ह्यू याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली होती.
 
पवननं आपल्या अर्जात घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळून लावलीय. याबरोबर उद्या त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती  देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. 
 
उल्लेखनीय आहे की या प्रकरणातील इतर तीन दोषी मुकेश, विनय आणि अक्षय यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.