शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (13:50 IST)

PM मोदी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करणार

2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशला आज सर्वात मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जेवारमध्ये आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाची पायाभरणी करणार आहेत. जेवारमधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणीसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी रॅलीही काढणार आहेत. आज दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी जेवारमधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करतील. भूमिपूजन कार्यक्रमानंतर मोठी रॅलीही निघणार आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समावेशासह, यूपी हे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील एकमेव राज्य बनेल. विमानतळाच्या भूमिपूजनाची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू होती. 34 हजार कोटी रुपये खर्चून तयार होणारा हा विमानतळ सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होणार आहे. 6,200 हेक्टर क्षेत्रात तयार होत असलेल्या या विमानतळावर 5 धावपट्टी आणि 2 टर्मिनल असतील.
 
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले की, पीएम मोदींच्या हस्ते नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणीसोबतच पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांचे वर्षानुवर्षे जुने स्वप्नही पूर्ण होईल. हे विमानतळ उत्तर प्रदेशला चांगल्या भविष्याकडे घेऊन जाईल आणि त्यामुळेच या भागातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.