गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (17:58 IST)

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालखी मार्गाची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारकरी संप्रदायासाठी महत्वाच्या असलेल्या १० हजार कोटींच्या पालखी मार्ग संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या मुख्य भागांच्या चौपदरीकरणाची पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.
 
आषाढी वारीसाठी आळंदी व देहू मधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे.
 
इतकेच नाही तर पंढरपूरला जोडण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवरील २२३ किलोमीटरहून अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पही पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यासाठी 1180 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांमध्ये NH 561-A चा म्हसवड-पिलीव-पंढरपूर (NH 548-E), कुर्डुवाडी-पंढरपूर (NH 965-C), पंढरपूर-सांगोला (NH 965-C), टेंभुर्णी-पंढरपूर विभागाचा समावेश आहे.