रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 जानेवारी 2018 (15:17 IST)

भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ७ सैनिक ठार

पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ७ सैनिक मारले गेले आहेत. भारताने केलेल्या या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. या कारवाईच पाकिस्तानचे ४ जवान जखमी देखील झाले आहेत.
 

दरम्यान, लष्कर प्रमुखांनी जम्मू काश्मीरबाबत आपली मतं पुन्हा नोंदवली. जोवर जम्मू काशमीरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही तोवर भारतीय लष्कर शांत बसणार नाही. खो-यात शांत प्रस्थापित करण्यासाठी रणनिती तयार करणं आवश्यक आहे, सैन्य अभियानं वाढवणं गरजेंच आहे असंही त्यांनी सांगितल आहे.