शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2023 (13:36 IST)

राहुल गांधी नव्या लूकमध्ये, दाढी-मिशी ट्रिम केली

काँग्रेस खासदार राहुल गांधी ब्रिटनमध्ये नव्या रुपात दिसले आहेत. केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी बुधवारी ब्रिटनमध्ये पोहोचलेले राहुल गांधी वेगळ्याच अंदाजात दिसले. कपड्यांपासून त्याच्या लूकपर्यंत सगळेच बदलले होते. गेल्या तीन महिन्यांपासून टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसणारे राहुल सूटमध्ये दिसले.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये राहुल गांधी लहान केस आणि ट्रिम केलेल्या दाढी आणि मिशीत दिसत आहेत. राहुल येथे त्याच्या ट्रेडमार्क पांढऱ्या टी-शर्टऐवजी कोट-टायमध्ये दिसले. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.
 
भारत जोडो यात्रेदरम्यान वाढलेली त्यांची दाढीही गायब होती. राहुल गांधींचा नवा लूक दाढीचा असला तरी त्यांनी दाढी ट्रिम केली आहे.  ‘Learning to listen in the 21st century’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी राहुल गांधी व्हिजिटिंग फेलो म्हणून केंब्रिज विद्यापीठात आले होते, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी 5 मार्च रोजी पश्चिम लंडनमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित करणार आहेत.
 
राहुल गांधींच्या भारत जोडो दौऱ्यात त्यांची वाढलेली दाढी चर्चेत होती. यात्रा संपल्यानंतर राहुल गांधी दाढी कधी कापणार हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होता.