मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (19:33 IST)

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना पॉझिटिव्ह,ट्विट करून दिली माहिती

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द सीएम अशोक गेहलोत यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. सीएम गेहलोत यांनी ट्विट केले की, गुरुवारी संध्याकाळी माझी कोरोना चाचणी झाली जी पॉझिटिव्ह आली. मला खूप सौम्य लक्षणे आहेत. इतर कोणता ही त्रास नाही. आज माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःलाआयसोलेट करून त्यांची कोविड चाचणी करून घ्यावी.
पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याच्या प्रकरणी सीएम गेहलोत यांनी गुरुवारी दुपारी पंजाबमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. काँग्रेस प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह मोठ्या संख्येने मीडिया कर्मचारी आणि पक्षाचे अधिकारी उपस्थित होते. यासोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षाचे नेतेही सीएम गेहलोत यांच्या संपर्कात आले. पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा हेही उपस्थित होते. दोतासरा सीएम अशोक गेहलोत यांच्या जवळ बसले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती. सीएम गेहलोत यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनीता गेहलोत यांनाही संसर्ग झाला आहे. सीएम गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे.