रतन टाटा यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट
उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. ही भेट संघाकडून गुप्त ठेवण्यात आली होती. सकाळी १०.३० च्या सुमारास टाटा यांनी संघ मुख्यालयात डॉ.भागवत यांची भेट घेतली व त्यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. याअगोदर २८ डिसेंबर २०१६ रोजी टाटा यांनी अचानकपणे संघ मुख्यालयाला भेट दिली होती. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर ती भेट झाल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर २०१८ मध्येदेखील त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. दरम्यान,भेटीत नेमकी काय चर्चा झाली व हा दौरा इतका गुप्त का ठेवण्यात आला यासंदर्भात ठोस माहिती मिळू शकली नाही.