शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (23:01 IST)

साकीनाका बलात्कार, राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुमोटो याचिका दाखल

साकीनाका बलात्कार प्रकरणात राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठीचा वेळ सरकारकडे नाही, असा आरोप विरोधक करत आहे. या प्रकरणातील पीडितेचा शनिवारी अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. आता या संपुर्ण प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने  घेतली आहे. या संपुर्ण प्रकरणाची सुमोटो याचिका दाखल करत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संपुर्ण प्रकरणात सायंकाळपर्यंत जर काहीच घडामोड घडली नाही, तर मी मुंबईला या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदस्य पाठवणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटूंबीयांना मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या डीजीपी यांना पत्र लिहित पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
 
पत्रात रेखा शर्मा यांनी लिहिले की, “पीडितेला ज्या क्रूरतेला आणि अत्याचाराला सामोरे जावे लागले त्याबद्दल आयोग निराश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. या प्रकरणातील गुन्हा लक्षात घेत कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवावा.”
 
राष्ट्रीय महिला आयोगाने, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 357 (अ) अन्वये पीडितेच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासह पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या कारवाईबद्दल आयोगाला लवकरात लवकर माहिती द्यावी अशी मागणी केली आहे.