शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मे 2018 (15:27 IST)

तिने फेसबुकवर केली लग्नासाठी पोस्ट, झाली सोशल मिडीयावर व्हायरल

कोणत्याही मुलीला किंवा मुलाला आपले लग्न व्हावे आवडता योग्य जोडीदार मिळावा म्हणून इच्छुक असतात. केरळमधल्या एका तरुणीने फेसबुकवरुन चक्क मार्क झुकरबर्गला लग्न जुळवण्यासाठी गळ घातली आहे. ज्योती केजी असं या तरुणीचं नाव असून ती मलप्पुर्रमची रहिवासी आहे. तिने पोस्ट लिहिली असून मार्कला गळ घातली आहे. वर शोधण्यासाठी तिने स्वत:चा बायोडेटा तयार तर केला असून, मल्याळममध्ये लिहिलेला हा बायोडेटा तिने फेसबुकवर अपलोड केला आहे. तिची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
 
या पोस्ट मध्ये ती लिहिते लग्नासाठी सुयोग्य वराच्या मी शोध घेत असून, तुमच्या पाहण्यात मुलगा असेल तर नक्की कळवा, मुलाकडून माझी कोणतीही अपेक्षा नाही. पत्रिका, जात-पात या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. माझे आई-वडील या जगात नाहीत. मी फॅशन डिझाईनिंगमध्ये बीएससी केलं आहे. माझं वय 28वर्षे आहे. माझा भाऊ मुंबईत सीनियर आर्ट डायरेक्टर आहे. तर बहिण सिव्हिल इंजिनीअरिंग करत आहे असे तिने स्पष्ट केले आहे.
 
ज्योतीने 26 एप्रिलला ही जाहिरात वजा मागणी पोस्ट केली होती. या पोस्टला आतापर्यंत सहा हजारांहून अधिक शेअर मिळाले आहेत. इतकंच नाही तर फेसबुकने लग्न जुळवणारी मेट्रिमोनियल साईट सुरु करावी, अशी विनंती तिनं मार्क झुकरबर्गला केली आहे. तर मार्क झुकरबर्ग ने आधीच डेटिंग साठी अर्थात लग्नासाठी साईट सुरु करण्याची घोषणा केली आहे.