गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2018 (15:24 IST)

बॉम्ब बनवणारा ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशीला बेड्या

आपल्या देशात २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घातपात कारवाई करणार असणारा ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी पोलिसांनी पकडला आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या, अब्दुल सुभान कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने, बेड्या ठोकल्या आहेत. कुरेशीने राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. तर आपल्या देशात अब्दुल कुरेशी हा भारताचा ‘लादेन’ म्हणून परिचीत आहे. हा उच्च शिक्षित असून  इंग्रजी माध्यमातून शिकलेला आहे. अब्दुल कुरेशी हा देशातील अनेक बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. दिल्लीतील गाजीपूर परिसरातून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.