गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:51 IST)

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला, पुढील आदेश मिळेपर्यंत काम थांबविण्याचे लेखी आदेश जारी केले. या स्थगितीवरून शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना टार्गेट केले असून, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही नामुष्की ओढवल्याचा आरोप केला. 
 
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. या याचिकेवर सुनावणी झाली असता, न्यायालयाने शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश दिले. याबाबतची माहिती सरकारी वकिलांनी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश दिले.