शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2017 (20:05 IST)

अम्बी व्हॅलीचा लिलाव करा : सुप्रीम कोर्ट

सहारा समुहाची पुण्यातील अम्बी व्हॅली या टाऊनशीपच्या लिलावाचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. यासाठी मुंबई हायकोर्टाची लिक्वीडेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना 28 एप्रिल रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणीपूर्वी सहाराने काही ठोस पर्याय उपलब्ध करुन दिला तर लिलाव टाळली जाऊ शकते, असे संकेतही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

पुण्यातील सहारा समुहाची अॅम्बी व्हॅली ही टाऊनशीप जप्त करण्याचे आदेश देऊन सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाला मोठा दणका दिला होता. सहारा समुहाने 14 हजार 779 रुपयांची थकबाकी लवकरात लवकर जमा करावी, यासाठी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत.