शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (14:59 IST)

भीषण अपघात, दोन ट्रेलर पेटले, 4 जणांना होरपळून मृत्यू

अजमेर जिल्ह्यातील परबतपुरा बायपासवर दोन ट्रकात भीषण धडक झाल्याची बातमी आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
 
दोन मालवाहतूक ट्रकची समोरसमोर धडक बसल्यानंतर त्यामध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील परबतपुरा बायपास रोडवर झाला आहे. 
 
या अपघाताची माहिती मिळताच आदर्श नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
 
या अपघातात 4 लोकांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढणे खूप कठीण होते आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि महामार्ग संघाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मृतदेह बाहेर काढून जेएलएन रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
 
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त एसपी सीताराम प्रजापती घटनास्थळी पोहचले, त्यांनी सांगितले की, संगमरवरी आणि पावडरने भरलेले दोन ट्रक बेवार आणि अजमेर येथून येत होते, त्यापैकी बेवारकडून येणाऱ्या ट्रकच्या चालकाला डुलकी लागली आणि ट्रकने अनियंत्रितपणे दुभाजकावर उडी मारली आणि दुसर्या ट्रकला धडक दिली ज्यामुळे आग लागली आणि आग इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकच्या चालक-सहायकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.