शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 जून 2020 (09:11 IST)

संतापजनक, गर्भवती गाईला फटाक्यांचा बॉल बनवून खायला दिला

केरळच्या मलप्पुरममध्ये अननसातून फटाके खायला दिल्याने गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना हिमाचल प्रदेशातून असंच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका गर्भवती गाईला फटाक्यांचा बॉल बनवून खायला दिला. फटाके तोंडात फुटल्याने गायीच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यातील झांडुटा भागातली घटना आहे. गायीच्या मालकाने या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर टाकला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
 
गाईचा मालक गुर्दील सिंगने त्याचे शेजारी नंदलाल यांच्यावर मुद्दामहून गाईला इजा पोहोचवली, असा आरोप केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर नंदलाल फरार असल्याचं गुर्दील यांनी सांगितलं आहे. गुर्दील सिंगने गाईचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ही घटना दहा दिवसांपूर्वीची आहे.