शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:45 IST)

बाप्परे, विमान धावपट्टीवर उतरतांना टायर फुटले

थाई एयरवेजच्या बँकॉक-मुंबई विमान धावपट्टीवर उतरत असतानाच टायर अचानक फुटल्याने खळबळ उडाली. या विमानात 292 प्रवासी होते. सोमवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली. यात कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, टायर फुटल्यानंतर त्याच्या हादर्‍याने धावपट्टीवर मोठा खड्डा पडला व मातीचा ढिगाराही दिसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत हा सलग दुसरा विमान अपघात आहे. दोनच दिवसांपूर्वी एयरइंडिया आणि विस्ताराची विमाने मुंबईच्या अवकाशात एकमेकांवर आदळता-आदळता राहिली. एयर इंडियाच्या महिला पायलट अनुपमा कोहली यांच्या प्रसंगावधानामुळे ही मोठी दुर्घटना टळली.