स्तनपानाचा तो फोटो अश्लिल नाही, तुमचे डोळे अश्लिल - कोर्ट
पुन्हा एकदा न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.‘गृहलक्ष्मी’मासिकाच्या मुखपृष्ठावर बाळाला स्तनपान करतानाचा मॉडेलचा फोटो छापल्यामुळे मासिकाच्या विरोधात काही जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अश्लिलता ही फोटोत नसून बघणाऱ्याच्या डोळ्यात आहे, असं म्हणत केरळच्या उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना जोरदार झापले आहे. १ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या आवृत्तीवर मॉडेल गिलू जोसेफ हिचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो छापण्यात आला होता. मात्र फोटो प्रसिद्ध होताच अनेक या विरोधात बोलू लागले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण केला. तर असे फोटो का छापले असे विचारात न्यायालयात धाव घेतली होती. स्तनपान करतानाचा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आला होता. त्यासोबत “कृपया नजर रोखून बघू नका आम्ही बाळाला दूध पाजत आहोत.”असा संदेश पुरुषांसाठी देण्यात आलेला होता. मात्र कोर्टाने उलट याचिका कर्ते सर्वाना जोरदार झापले आहे. तुमचे डोळे तपासा फोटो नाही तुमची नजर अश्लिल आहे असे मत न्यायलयाने मांडले आहे. त्यामुळे गृह्शोभा आणि त्या मॉडेल यांना न्याय मिळाला आहे.