मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 21 जानेवारी 2021 (07:37 IST)

शेतकरी लाँग मार्चमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी होणार

“केंद्र सरकारने देशातील शेतक-यांवर लादलेल्या काळ्या कृषी कायद्यांविरोधात, शेतकरी संघटना व स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत २३ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. २५ तारखेला आझाद मैदान येथून राजभवनावर काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चमध्येही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.” अशी माहिती काँग्रेस नेते व माजीमंत्री नसीम खान यांनी दिली आहे.
 
यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, “मोदी सरकारने शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचा विडा उचलला असून, शेतक-यांना भांडवलदारांच्या हातचे गुलाम बनवण्याचे काम या कृषी कायद्याच्या माध्यमातून केले गेले आहे. या काळ्या कायद्यांना काँग्रेस पक्षाचा पहिल्यापासूनच विरोध राहिला आहे. संसदेतही राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेस खासदारांनी या कायद्याला विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत देशभर काँग्रेसने आंदोलने केली आहेत. महाराष्ट्रातही विविध आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने या काळ्या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत आहे. केंद्र सरकारचे जुलमी कायदे महाविकास आघाडी सरकार राज्यात लागू करणार नाही.”