शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (20:56 IST)

प्रेमात धोका दिल्याने साखरपुड्याच्याच दिवशी प्रियकराची हत्या

प्रेमात धोका मिळाल्याने एका प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आणि प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. प्रियकराचं लग्न ठरल्यामुळे नाराज झालेल्या महिलेने त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून याचा अधिक तपास सुरू आहे. 
 
प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं साखरपुड्याच्याच दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या केली नंतर मृतदेह एका नाल्यात फेकून दिला. नंतर मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. 
 
यूपीच्या प्रतापगढ येथील राजेंद्र वर्मा या युवकाच्या हत्या प्रकरणात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. युवक राजेंद्र वर्माची हत्या इतर कोणी न करता त्याची प्रियकरने केली होती. महिला विवाहित आहे. पण ती बऱ्याच काळापासून राजेंद्र वर्माच्या प्रेमात होती.
 
राजेंद्र वर्मा याचं मागील काही दिवसांपासून रामनगर भोजपूर येथील सोना देवी नावाच्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही दिवसांपूर्वी राजेंद्रचं लग्न ठरलं होतं. त्याचा साखरपुडाही होणार होता. पण आपल्या प्रियकराचं लग्न होतंय हे समजल्यावर सोना देवी राजेंद्रवर अत्यंत नाराज झाली होती. प्रेमात धोका मिळाल्याने तिने आपला भाऊ आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीनं राजेंद्रच्या हत्येचा कट रचला.
 
साखपुड्याची तयारी करण्याकरता राजेंद्र आपल्या घरी निघाला तेव्हा प्रेयसीने लग्नापूर्वी भेट म्हणून त्याला बोलावले. हत्येपूर्वी आरोपींनी राजेंद्रला लखनऊ येथून आपल्या चारचाकी गाडीत बसवले. सोना देवीचा भाऊ आणि त्याचे अन्य दोन साथीदार या गाडीत आधीपासूनच बसून होते. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर प्रेयसी सोना देवी, तिचा भाऊ आणि अन्य दोन साथीदारांनी राजेंद्रचा गळा चिरून खून केला.
 
आरोपींनी त्यानंतर एका नाल्यात राजेंद्रचा मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या तीन दिवसांनी राजेंद्र याचा मृतदेह नाल्यात आढळला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता याबाबत माहिती मिळाली. महिलेला अटक करण्यात आली. तिने प्रेमात धोका मिळाल्याने आपणच हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच तिच्या साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.