कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यंदाच्या वर्षीसाठीच्या कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी यात्रेकरुंच्या पहिल्या गटाला हिरवा कंदील दाखवला. त्यांनी यात्रेच्या नियोजनात सहकार्य केल्याबद्दल चीनचेही आभार मानले. यंदाच्या वर्षी ८ सप्टेंबरपर्यंत ही यात्रा सुरु असणार आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन ते अडीच लाख खर्च असणाऱ्य़ा या यात्रेसाठी यंदाच्या वर्षी भाविकांना दोन गटांमध्ये पाठवण्यात येणार आहे. यात्रेसाठी प्रथम १८ तुकड्यांमध्ये प्रत्येक तुकडीत ६० यात्रेकरु पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर १० तुकड्यांमध्ये प्रत्येकी ४८ यात्रेकरु पाठवण्यात येणार आहेत.