शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (09:41 IST)

'विस्टाडोम'चा डबा सेवेत दाखल

अत्यंत आधुनिक आणि आलिशान असणारा विस्टाडोमचा एक डबा  कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पारदर्शक डबा असलेली ही गाडी रुळांवर धावत आहे. विस्टाडोम डब्याचं तिकीट विमान प्रवासाइतकंच आहे. या डब्यातून मुंबई ते गोवा प्रवासासाठी दोन हजार 325 रुपये मोजावे लागतील. तर दादर ते रत्नागिरीपर्यंतसाठी १,४८० रुपये भाडे आहे.

सध्या पावसाळी वेळापत्रक जनशताब्दी ट्रेनला लागू असून दादरहून पारदर्शक डबा असलेली ही ट्रेन १८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबपर्यंत प्रत्येक सोमवारी, गुरुवारी, शनिवारी धावेल. तर मडगाव येथून १९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबपर्यंत प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी सुटेल. पावसाळ्यानंतर ही ट्रेन २ नोव्हेंबरपासून सहा दिवस धावणार आहे. या ट्रेनला जोडण्यात आलेल्या पारदर्शक डब्यामध्ये ४० आरामदायी आसने, पाय ठेवण्यासाठी मोकळी जागा, १२ एलसीडी, एक फ्रीज आणि फ्रिजर, वैयक्तिक मोबाईल चार्जिग सुविधा, एक ओव्हन, प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा इत्यादी सुविधा यात आहेत.