रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (13:59 IST)

दोन शाळकरी विद्यार्थी रातोरात करोडपती झाले, एकाच्या खात्यात 900 कोटी, दुसऱ्याच्या 60 कोटींहून अधिक पैसे जमा

बिहारमध्ये सरकारी दुर्लक्षामुळे लोकांच्या बँक खात्यात पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरूच आहे. खगरियामध्ये एका तरुणाच्या खात्यात साडेपाच लाख रुपये येण्याचे प्रकरण अजून संपलेले नाही अजून एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 960 कोटी रुपये आले आहेत. दोन बँक खात्यांमध्ये 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम पाहिल्यानंतर बँक अधिकारी सुद्धा काहीही समजू शकत नाहीत.
 
सरकारी किंवा बँक अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणा नंतर, लोक त्यांचे खाते तपासण्यासाठी बँक किंवा CSP केंद्र गाठत आहेत. बँका आणि सीएसपी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा पोहोचल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे पैसे त्यांच्या खात्यात आल्याची भीती काही लोकांना आहे. तर काही लोक मोदी सरकारचं कौतुक करत आहेत की 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती, तर आता त्यांना पैसे मिळत आहेत.
 
पोशकच्या नावे खात्यात आली रक्कम
 
दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बघौरा पंचायतीमध्ये असलेल्या पस्तिया गावातील रहिवासी आहेत. वास्तविक, बिहारमधील शालेय विद्यार्थ्यांना युनिफॉर्मसाठी सरकारकडून पैसा थेट मुलांच्या बँक खात्यात येतो. खात्यातील कपड्यांच्या रकमेची चौकशी करण्यासाठी गुरुचंद्र विश्वास आणि असित कुमार यांनी जेव्हा सीएसपी केंद्र गाठलं तर इथे दोघांना कळले की त्यांच्या खात्यात तर कोट्यावधी रुपये जमा आहेत. हे ऐकून मुलांना धक्का बसला आणि तिथे उपस्थित इतरांनाही धक्का बसला. विद्यार्थी असित कुमार - 1008151030208001 च्या खात्यात 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. गुरुचंद्र विश्वास खात्यात - 1008151030208081 मध्ये 60 कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत. दोन्ही खाती उत्तर बिहार ग्रामीण बँक भेलागंज शाखेची आहेत.
 
ग्रामीण बँकेच्या भेलागंजचे शाखा व्यवस्थापक मनोज गुप्ता देखील मुलांच्या खात्यातील जमा राशी पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी दोन्ही मुलांच्या खात्यातून लगेच पैसे भरणे बंद केले आणि खाती फ्रीज करत ते म्हणाले की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.