शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (11:22 IST)

Vice Presidential Election 2022 उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

नवी दिल्ली : देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज संसद भवनात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर मार्गारेट अल्वा यांच्या तुलनेत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखर यांचे पारडे जड असल्याचे दिसते.
  
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मतदान केले
 
 माजी पंतप्रधान आणि काँग्रेस खासदार डॉ. मनमोहन सिंग यांनी आज संसदेत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.