मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (13:20 IST)

नाचता नाचत महिलेला अचानक आला हृदयविकाराचा झटका,महिलेचा मृत्यू

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात नृत्य करताना एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, मध्ये अनेक महिला एकत्र नाचत असताना अचानक एक महिला जमिनीवर कोसळून पडली.तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

लग्न समारंभात एक  60 वर्षीय महिला नाचत असताना अचानक स्टेजवर पडली आणि पुन्हा उठू शकली नाही. महिलेला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलेला हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.यशोदा साहू असे या मयत महिलेचे नाव आहे. 
ही घटना सिवनी जिल्ह्यातील बखरी गावातील आहे. बुधवारी रात्री येथील एका लग्न समारंभात संगीतमय कार्यक्रम सुरू होता. यावेळी काही महिला नाचत होत्या. कुटुंबीयांनी क्षणाचा विलंब न करता तातडीनं त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Edited By- Priya Dixit