गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (11:17 IST)

Video ट्रेनच्या दोन डब्ब्यांच्या जॉइंटवर बसून जीवघेणा प्रवास

train
Twitter
Woman traveling with child on train joint रेल्वेकडून वारंवार सूचना देऊनही काही प्रवासी निष्काळजीपणा करताना दिसून येतात. अशामुळेच रेल्वे अपघाताच्या घटना घडतात. आता व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला लहान मुलाला मांडीवर घेऊन ट्रेनच्या दोन डब्यांच्या जॉइंटवर बसून प्रवास करत आहे. दोन डब्यांची ही जॉइंट म्हणजे लोखंडाची एक पातळ पट्टी आहे; ज्यावर जीव मुठीत घेऊन ही महिला बसलेली आहे. महिलेने एका हातात मुलाला धरले आहे आणि दुसऱ्या हाताने ट्रेनच्या रॉडला पकडले आहे. ट्रेन सुसाट वेगात जात असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिलेने थोडासाही निष्काळजीपणा केला, तर ती खाली पडू शकेल, असे त्यात दिसते आहे.
रेल्वे अपघाताच्या बातम्या येऊनही लोक सतर्क होत नाहीत. याबाबत भारतीय रेल्वेकडून अनेक जनजागृती मोहिमाही राबवल्या जातात. याशिवाय सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे स्थानकांवर सातत्याने मार्गदर्शक सूचनाही दिल्या जातात. तरीही प्रवाशांचे निष्काळजीपणा दिसून येत असून त्यामुळे ते अपघाताचे बळी ठरत आहेत. तसंच या व्हिडिओमध्ये दिसत आहे. थोडासाही निष्काळजीपणा झाला तर ही महिला ट्रेनमधून खाली पडू शकते.