गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 मार्च 2019 (13:09 IST)

यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू, 30 जखमी

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा ठाण्याच्या रबूपुरा क्षेत्रात यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. यात 8 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यात 30 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. जखमी लोकांना उपचारासाठी जेवरच्या कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातून काही जखमी लोकांची हालत नाजुक असल्याची सांगण्यात येत आहे. अपघात यमुना एक्सप्रेस वेवर जिरो पॉइंटहून 29 किलोमीटर पुढे झाला आहे.
 
प्राप्त माहितीनुसार आग्रा ते ग्रेटर नोएडाकडे जात असलेली प्रवाशांनी भरलेली बस ब्रेक फेल झाल्यामुळे पुढे चालत असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. घटना शुक्रवारी सकाळी सुमारे 5 वाजता घडली. यात 8 लोकं मृत्युमुखी पडले. सूचना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहचली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाची तपासणी सुरू केली.
 
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी ग्रेटर नोएडा बस अपघाताची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून रिपोर्ट मागितली आहे. सोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून या अपघातावर दु:ख प्रकट केले आहे. सीएम योगी यांनी मृतकांच्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. सोबतच जखमी लोकांच्या आरोग्यासाठी कामना केली आहे.