शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (10:31 IST)

नवरात्रीत देवीची घटस्थापना पूजा विधी

नवरात्रात पूजा कशी करावी जाणून घेऊया त्याचे नियम काय आहेत.
 
* अश्विन शुक्ल प्रतिपदेला ब्रह्म मुहुर्तात स्नान करावे.
 
* घरातील कोणत्याही पवित्र जागेत स्वच्छ मातीने वेदी बनवावी.
 
* वेदीत जव आणि गव्हाचे दाणे मिसळून पेरावे.
 
* वेदीवर किंवा त्याचा जवळच्या पवित्र जमिनीची पूजा करावी आणि त्या ठिकाणी सोनं, चांदी, तांबा किंवा मातीचे घट स्थापित करावे.
 
* या नंतर त्या कलशात किंवा घटात आंब्याचे पानं, दुर्वा आणि पंचामृत टाकून त्याचा तोंडाला पवित्र सूत्र बांधावे.
 
* कलश किंवा घट स्थापनेनंतर गणपतीची पूजा करावी.
 
* या नंतर वेदीच्या बाजूने देवी आईची कोणतीही धातू, दगड, माती आणि तसवीरीची विधी-विधानाने स्थापना करावी.
 
* नंतर मूर्तीचे आसन, पाद्य, अर्ध, आचमन, स्नान, कापड, गंध, अक्षत, फुले, धूप दिवा, नैवेद्य, आचमन, पुष्पांजली, नमस्कार आणि प्रार्थना करून पूजा करावी.
 
* दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि दुर्गा स्तुती करावी.
 
* पाठाचे वाचन केल्यावर दुर्गेची आरती करून प्रसाद वाटप करावा.
 
* कन्यांना जेवण द्या. नंतर स्वतः फळे खा.
 
प्रतिपदेपासूनच घरात जव पेरण्याचा विधान आहे. नवमीच्या दिवशी या जवानां डोक्यावर ठेवून एखाद्या नदी किंवा तलावात विसर्जित करावे. अष्टमी आणि नवमी या महातिथी असतात. या दोन्ही दिवसात पारायण केल्यावरच हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार कुमारिकांना जेवायला द्यावं.
 
नवरात्रात काय करावे आणि काय नाही
 
* या दिवसात उपवास करणाऱ्यांनी जमिनीवर झोपावं.
 
* ब्रह्मचर्याचे पालन करावे.
 
* उपवास करणाऱ्यांनी फलाहार करावे.
 
* नारळ, लिंबू, डाळिंब, केळी, मोसंबी आणि फणसाचे आणि अन्नाचे नैवेद्य दाखवावे.
 
* उपवास करणाऱ्यांना संकल्प घ्यावा की ते नेहमी क्षमा, दयाळू आणि उदार राहतील.
 
* या दिवसात उपवास करणाऱ्यांना राग, मोह, आणि लोभ सारख्या प्रवृत्तीचा त्याग करावा.
 
* देवीचे आवाहन, पूजा, विसर्जन पाठ इत्यादी सकाळच्या वेळेस शुभ असतात. म्हणून हे या वेळेसच पूर्ण करावे.
 
* घट स्थापनेनंतर सुतक लागल्यावर, त्याचा काहीच दोष नसतो, पण जर का घटस्थापनेच्या पूर्वी सुतक लागले असतील तर पूजा करू नये.