Last Modified: गुरूवार, 25 ऑक्टोबर 2012 (16:50 IST)
अॅपल आयपॅड मिनी: पतला व हलका
PR
PR
अॅपलच्या आयपॅड मिनीचे आज बाजारात दमदार आगमन झाले. गुगल, सॅमसंगच्या मक्तेदारी असलेल्या या सेगमेंटमध्ये आता अॅपलने पाय ठेवला आहे.
तीन व्हर्जन १६, ३२ व ६४ जीबी मध्ये हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये मायक्रो एसडी कार्ड नाही. याची ऑनलाइन विक्री शुक्रवारपासून सुरु होईल. मिनीवर टाकलेली एक नजर....
७.२ एमएम जाडी असलेला आयपॅड मिनीचे वजन जवळपास ३०० ग्रॅम आहे. मिनी हा आयपॅडपेक्षा २३ टक्के पतला ५३ टक्के हलका आहे. किंमत: ३२९ डॉलर म्हणजे जवळपास १८,००० रुपये आहे. ६४ जीबी व्हर्जनची किंमत ४५९ डॉलर म्हणजे २४,००० रुपये आहे.
स्क्रीन: ७.९ इंचाची स्क्रीन असून ही इतर आयपॅडच्या तुलनेत मोठी आहे. १०२४X७६८ पिक्सेल रिझॉल्यूशन डिस्प्ले आहे.
प्रोसेसर: ए5 ड्यूल कोर. १० तासांचा बॅटरी बॅकअप.
कॅमेरा: ५ मेगापिक्सल रियर एचडी कॅमेरा आणि १.२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा.