शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (15:58 IST)

Pixel चे हे फोन Google Keynote मध्ये लॉचं होऊ शकतात

गूगलचे स्मार्टफोन 3a आणि 3a XL च्या बाबतीत असा अंदाज लावण्यात आला आहे की 8 मे रोजी दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉचं होतील. प्रत्यक्षात, गूगलने 7 मे रोजी होणाऱ्या आपल्या कीनोटमध्ये काही उत्पादन आणण्याविषयी माहिती दिली होती. जरी कंपनीने Pixel 3a आणि Pixel 3a XL चे नाव घेतलं नाही तरी बरेच अहवाल या हँडसेटकडे निर्देश करत आहे. हे फोन ऑनलाईन स्टोअरवरून खरेदी केले जाऊ शकतात.
 
Pixel 3a मध्ये 5.6 इंचाची फुल-एचडी प्लस स्क्रीन अपेक्षित आहे जेव्हा की Pixel 3a XL मध्ये 6-इंची फुल-एचडी प्लस स्क्रीन असेल. पिक्सेल 3ए मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो जेव्हा की पिक्सेल 3ए एक्सएल मध्ये स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर. दोन्ही हँडसेट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येऊ शकतात. तरीही कंपनीने सध्या अधिकृतपणे या सर्व फीचर्सची माहिती दिली नाही आहे.