मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (15:15 IST)

बाप्परे, पुण्यात मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार

rape
पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाला आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते. शुक्रवारी दुपारी ती सार्वजनिक शौचालयात गेली असता, आरोपी ही तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला. त्यानंतर तिला खाली पाडून जबरदस्तीने त्याची शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पळून गेला. पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडली. पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा चांगला ओळखीचा आहे. तो दररोज पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.