मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (14:28 IST)

अरुण राठोडला पोलिसांनी चौकशीसाठी घेतले ताब्यात

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अरुण राठोड याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. अरुण राठोड याची पोलीस आयुक्तालयात चौकशी होण्याची शक्यता आहे.
 
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला आहे. या अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे.  वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण राठोडची चौकशी करणार आहेत. याप्रकरणी एकूण तीन पथक चौकशी काम करत आहेत.