पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं भीक मागो आंदोलन
गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्यात विलगीकरण करण्यात यावे यावर काही निर्णय अद्याप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले नाही. आंदोलन दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. या मुळे घरातील कर्तामाणूस गमावलेल्या कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरी जावे लागले. आमची आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही या साठी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यातील पिंपरी -चिंचवड येथे एसटी कर्मचारी भीक मागो आंदोलन करत आहे. आज सिग्नलवर भीक मागून मिळालेल्या पैशातून ढोल विकत घेऊ आणि तो वाजवून आपला आवाज राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचवू . हा आमचा प्रयत्न आहे. असे भीक मागो आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनाची माहिती मिळतातच पोलीस प्रभारी आणि भोसरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आंदोलन स्थळी पोहोचले. या दरम्यान काही कर्मचारी आक्रमक झाले होते. राज्यात आता पर्यंत 80 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून राज्याचे मुख्यमंत्री काहीच निर्णय घेत नाही. आमचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही हे आमचे दुर्देव असल्याचे एसटी कर्मचारी म्हणाले. या मुळे आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.