बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (21:37 IST)

वीज कोसळल्यानं वडिलाच्या डोळ्यासमोर मुलीचा मृत्यू

कॉलेजमधून घरी आलेल्या मुलीच्या अंगावर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. वडिलांच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने वडिलांना मोठा धक्का बसला. ही घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील भोरदरा गावात गुरुवारी (दि.7) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मीरा सखाराम लोहकरे वय-19) असं या तरुणीचे नाव आहे.
 
या घटनेची माहिती मिराचे वडिल सखाराम लिंबाजी लोहकरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar police station) कळवली आहे.पुणे जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.आंबेगाव तालुक्यात देखील सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला होता.
 
मीरा कॉलेज वरून घरी येत होती. मीराचे वडील तिला दुचाकीवरुन घेऊन येत होते.घराजवळ आले असता सखाराम यांनी मीराला खाली उतरुन चिखल बघून चालत ये असे सांगून ते पुढे जात होते.त्याचवेळी मीराच्या अंगावर वीज कोसळली. मीराला तातडीने मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी तिला मृत (Pune Crime)घोषीत केले.घटना जरी दोन दिवसा पूर्वीची आहे तरी पोलिसानी पूर्ण तपास करत घटनेची आज नोंद घेतली आहे.