बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (13:46 IST)

पुण्यात देशातली पहिली सॅनिटायझेशन व्हॅन 'संजीवनी'

जगभरात करोना व्हायरसमुळे हाहाकार होत असताना लोकांना घरात दडून बसणे भाग आहे परंतू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन दिवस रात्र मेहनत घेत आहे. यात महत्वाची जबाबदारी पोलीस प्रशासन पार पाडत असून 24 तास रस्त्यावर पहारा दिला जात आहे. त्यांनादेखील करोनाचा तेवढाच धोका आहे. हे लक्षात घेत पुण्यात देशातील पहिली सॅनिटायझेशन व्हॅन दाखल झाली आहे. 
 
पुणे पोलिसांच्या सेवेत दाखल झालेली ‘संजीवनी’ व्हॅन खास पोलिसांच्या सुरक्षेसाठी आहे. शहरातील अनेक भागात तैनात असणार्‍या कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल मिस्टींग सॅनिटायझर वाहनात साधारण 10 सेकंद थांबल्यास निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे. 
 
आता अशा प्रकारचे वाहन टप्प्या टप्प्याने शहरातील इतर भागात देखील सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.