मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (16:50 IST)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत वसंत मोरे यांची भेट

फोटो -साभार सोशल मीडिया 
आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली. त्यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण आले आहे. पुण्यात एका लग्नसोहळ्यात वसंत मोरे आणि संजय राऊतांची भेट झाली.राऊतांनी या भेटीत मोरेंना 'तात्या' नावाने हाक दिली आणि त्यांना भेटले. त्या नंतर त्यांनी मोरेंचे ठाणेच्या भासणार बद्दल आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. नंतर 'पुन्हा भेटू' म्हणत त्यांनी एकमेकांकडून निरोप घेतला.  
 
मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे यांनी नाराजगी व्यक्त केली होती.राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनावर वसंत मोरे नाराज होते. त्यांनी ती नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. माझ्या प्रभागात मुस्लिम बहूल नागरिक अधिक आहेत. त्यांना त्रास होऊ नये, त्यामुळे म्हणून मी भोंग्याला विरोध करतो आहे, असं स्पष्ट मत त्यावेळी वसंत मोरेंनी यांनी व्यक्त केलं होतं.

त्यानंतर मनसे प्रमुखांनी त्यांना पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून काढले होते. माजी नगरसेवसक व मोरेंचे मित्र साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष देण्यात आले मोरेंनी पक्षाचा राजीनामा दिल्यावर ते पक्ष सोडून कुठल्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरु होती. या वर मोरेंनी मी मनसेतचं आहे आणि मनसेसैनिक म्हणूनच काम करणार असे सांगितले होते.वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होत होती. आज मोरे आणि राऊतांची भेट झाल्यावर पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.