1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (18:27 IST)

कोरोना लशीसाठीचा कच्चा माल युरोप-अमेरिकेनं रोखला - पूनावाला

करोना लशीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा देखील तुटवडा जाणवू लागल्याचं समोर आलं आहे.
 
"अमेरिका आणि युरोपमधून करोना लशीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे," असं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.
 
महाराष्ट्रासह काही राज्यांनी आतापासूनच करोना लशींचा आवश्यक तेवढा पुरवठा केंद्र सरकारकडून मिळत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे आगामी काळात करोना लशींची मागणी अजून वाढणार असताना, लशींच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाची कमतरता भासणं ही चिंतेची बाब मानली जात आहे.
 
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक महिन्याला 6 ते 6.5 कोटी डोस तयार केले जात आहेत.