मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 16 जून 2024 (12:43 IST)

धक्कादायक! पुण्यात सावत्र बापाकडून 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला अटक

minor
बाप आणि लेकीचं नातं काही वेगळंच असत. पण पुण्यात एका सावत्र बापाने चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या नराधामी बापाने मुलीला चाकूचे चटके दिले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी या आरोपी पिताला अटक केली आहे. सुनील चौहान असे या आरोपी पिताचे नाव आहे. 
 
सदर घटना 5 ते 14 जून दरम्यान घडली आहे. पीडित मुलगी रडत असून तिच्या हातावर चटक्याचे वन दिसत होते. शाळेतील एका शिक्षकाने मुलीला विचारल्यावर हा प्रकार उघडकीस आला.मुलीची आई मजुरीचे काम करत असून तिचे आरोपीशी प्रेम संबंध आहे. आणि हा पीडित मुलीचा सावत्र पिता आहे.

मुलीच्या आईने स्वतः आरोपाच्या विरोधात तक्रार दिली असून आरोपी मुलीशी गैरवर्तन करत असून त्याने मुलीला चाकूने चटके दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.आरोपी मुलीचा वारंवार छळ करत होता. तसेच त्याने मुलीला चटके दिले. या प्रकाराने मुलगी घाबरली होती. पोलीस ने आरोपी ला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit