शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:34 IST)

फक्त पाच रुपयांत स्वारगेट ते सहकारनगर बसमार्ग सुरू

PMPML च्या ‘अटल बस’ योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक एस 9 स्वारगेट ते सहकारनगर नं. 2 शेवटचा बस स्टॉप हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. पुण्याचे महापौर तथा PMPML चे संचालक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते  बससेवेचे उदघाटन करण्यात आले.अटल बस सेवेअंतर्गत प्रवाशांना फक्त पाच रुपयांत ही बससेवा उपलब्ध होणार आहे.
 
नगरसेवक महेश वाबळे यांच्या पाठपुराव्यातून ही बस सेवा सुरू झाली. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मनिषा महेश वाबळे PMPMLचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे,स्वारगेट आगार व्यवस्थापक राजेश कुदळे उपस्थित होते.
 
असा असेल बसमार्ग
स्वारगेट, लक्ष्मीनारायण टॉकीज,पंचमी हॉटेल,लक्ष्मीनगर,सारंग सोसायटी,सहकारनगर नं. 2 शेवटचा बस स्टॉप.
सध्या ही बस सेवा दर 40 मिनिटांनी उपलब्ध असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढवल्या जाणार आहेत.
 
याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुणे महानगपालिकेतर्फे PMPML च्या ताफ्यात 50 मिडी सीएनजी एसी बस देण्यात आल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून पुण्यदशम बससेवेअंतर्गत सध्या शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये 10 रुपयांत दिवसभर प्रवास ही सेवा पुरविली जात आहे. लवकरच PMPML च्या ताफ्यात आणखी मिडी सीएनजी एसी बस दाखल होतील व संपुर्ण शहरात पुण्यदशम बससेवा पुरवली जाईल.’
 
नगरसेवक महेश वाबळे म्हणाले, ‘शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नागरिकांनी बसचा वापर वाढवून खाजगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळली पाहिजे. तसेच PMPML च्या अधिकाऱ्यांनी सदरची बससेवा तत्परतेने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’