शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (08:13 IST)

पुणेपाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे

लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर आणि राजीव गांधी पंपिंग केंद्रात येत्या गुरूवारी (१३ ऑक्टोबर) विद्युत, पंपिंगविषयक तसेच स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्राअंतर्गत येत असलेल्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
 
पुणेपाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे
 
लष्कर जलकेंद्र : संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (काही भाग) संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स. 
Edited by : Ratnadeep Ranshoor