गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 6 मे 2024 (10:22 IST)

फलंदाजने मारला शॉट, बॉलरच्या प्रायव्हेट पार्टवर बॉल लागल्याने झाला मृत्यू

महाराष्ट्र मधील पुण्यामध्ये एक धक्का धक्क्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळतांना ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाने बॉलिंग केले पण फलंदाजाने त्याच्याच दिशेने शॉट मारल्याने या बॉलरच्या प्रायव्हेट पार्टवर हा बॉल येऊन लागला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले पण  चिकित्सकांनी त्याला मृत घोषित केले. 

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळतांना अवघ्या ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील लोहगांव मध्ये क्रिकेट खेळताना या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला बॉल लागल्याने या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा लहान मुलगा आपल्या इतर मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याची प्रॅक्टिस करीत होता. या मुलाचे नाव शौर्य असून हा बॉलिंग करीत होता आणि एक मुलगा बॅटिंग करीत होता. शौर्यने बॉलिंग केली असता बॅटिंग करणाऱ्या मुलाने शॉट मारला व तो शॉट येऊन थेट शौर्यच्या प्रायव्हेट पार्टला लागला. हा वेगवान बॉल लागल्याने शौर्य जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यू झालायची घटना नोंदवण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik