1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (11:36 IST)

एकतर्फी प्रेमातून तरुणीला कोयता उगारत धमकावले

crime
पुण्यात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर कोयताने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात घडली आहे. आरोपी दुचाकीवरून आलेला असून एका महिलेने आरडाओरड केल्यामुळे आरोपी पसार झाला. या प्रकरणी रात्री एका तरुणाला अटक केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगर परिसरातून दुपारच्या वेळी तरुणी आणि तिची मैत्रीण निघाली असता दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने तरुणीवर कोयता उगारला. यावर तरुणीने आणि तिथून निघणाऱ्या एका महिलेने आरडाओरड केल्याने तो तरुण पसार झाला. सुदैवाने या मध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. 
पोलिसांनी रात्री उशिरा कोयताने धाक दाखवणाऱ्या तरुणाला तळजाई टेकडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. या तरुणाची महाविद्यालयीन तरुणीची ओळख असून त्याने एक तर्फी प्रेमातून हे कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit